डी.एल.एड. अभ्यासक्रम धोक्यात? Is D.El.Ed. Course at Risk?

Is D.El.Ed. Course at Risk?

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या नव्या मसुद्यात चार वर्षांच्या बी.एड. अभ्यासक्रमाचा स्पष्ट उल्लेख आहे, मात्र डिप्लोमा इन एलिमेंट्री एज्युकेशन (डी.एल.एड.) अभ्यासक्रमाच्या कालावधीबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे डी.एल.एड. महाविद्यालयांचे भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व महत्वाचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल लगेच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा. 

Is D.El.Ed. Course at Risk?

संस्थांची वाढती चिंता

  • परिषदेने नव्याने एकात्मिक बी.एड. मान्यतेबाबत मसुदा प्रसिद्ध केला असून, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने त्यावर सूचना मागविल्या आहेत.
  • शिक्षक होण्यासाठी आता चार वर्षांचा बी.एड. अनिवार्य केला जाईल, त्यामुळे डी.एल.एड. अभ्यासक्रमाचे भवितव्य अनिश्चित असल्याची चिंता शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे.
  • ७०० हून अधिक व्यक्तींनी डी.एल.एड. अभ्यासक्रमाचा समावेश करण्याची मागणी केली आहे.

डी.एल.एड. बंद होणार का?

राज्य शिक्षक संघटनेचे विष्णू देसले यांनी डी.एल.एड. अभ्यासक्रमाच्या कालावधीबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने तो टप्प्याटप्प्याने बंद होणार का? अशी शंका उपस्थित केली आहे.

दरम्यान, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर यांनी एनसीटीईच्या संकेतस्थळावर मसुद्यावर सूचना पाठवण्याचे आवाहन केले असून अद्याप सर्व अभिप्राय प्राप्त झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.