सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना तरुणांसाठी IRCTC मध्ये उत्तम संधी ; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पगार !

irctc-vacancies-2025 !

IRCTC मध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पगार

इंडियन रेलवे केटरिंग आणि टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदासाठी भरती जाहीर केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवार ४ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.

irctc-vacancies-2025 !

पदसंख्या आणि आरक्षण:

IRCTC मार्फत एकूण ६ पदांसाठी भरती करण्यात येत आहे.

  • सामान्य प्रवर्ग: २ जागा
  • ओबीसी प्रवर्ग: ३ जागा
  • एससी प्रवर्ग: १ जागा

अर्ज प्रक्रिया आणि पात्रता:

शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांकडे हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीएससी पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, भारतीय पाककला संस्थांमधून बीबीए/एमबीए पदवी घेतलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा:

सामान्य उमेदवारांसाठी कमाल वय २८ वर्षे

ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची वयोसूट

एससी/एसटी उमेदवारांना ५ वर्षांची सवलत

दिव्यांग उमेदवारांना १० वर्षांची सवलत

निवड प्रक्रिया:

उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.यशस्वी उमेदवारांना

मेडिकल चाचणीसाठी बोलावले जाईल.चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर

२ वर्षांच्या करारावर (Contract) नोकरी दिली जाईल.

पगार आणि फायदे:

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹30,000/- पगार मिळेल.
यासोबत अतिरिक्त भत्ते आणि इतर फायदे देखील दिले जातील.

अर्ज कसा कराल?

इच्छुक उमेदवारांनी IRCTC च्या अधिकृत वेबसाइट irctc.com वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ मार्च २०२५ आहे.

 सरकारी नोकरीसाठी ही उत्तम संधी असल्याने इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा!

Leave A Reply

Your email address will not be published.