नवीन भरती जाहीर, IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत परीक्षा शिवाय नोकरी, अर्ज प्रक्रिया सुरू !

IPPB Recruitment 2025: Golden Opportunity for a Job in a Government Bank!

मित्रानो नवीन भरती जाहीर झालेली आहे . IPPB बँक अंतर्गत परीक्षेशिवाय भरती होणार आहे.इच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे. सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडिया  पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) थेट निवड प्रक्रियेद्वारे भरती सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही. एकूण 51 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत, आणि इच्छुक उमेदवार 1 मार्च 2025 पासून अधिकृत वेबसाईटवर (ippbonline.com) अर्ज करू शकतात.

IPPB Recruitment 2025: Golden Opportunity for a Job in a Government Bank!

अर्ज करण्याची अंतिम तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 मार्च 2025 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे. उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज भरावा, असा सल्ला देण्यात आला आहे. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

राज्यानुसार रिक्त पदे
या भरती प्रक्रियेत छत्तीसगड, आसाम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू यासह विविध राज्यांमध्ये रिक्त पदे आहेत. उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतात, आणि निवड प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

निवड प्रक्रिया आणि कंत्राटाचा कालावधी
या भरतीसाठी उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारावर होईल. अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचे पदवी परीक्षेतील गुण अचूक भरावेत. जर दोन उमेदवारांचे गुण सारखे असतील, तर त्यांची जन्मतारीख विचारात घेतली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल, त्यानंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल.

सुरुवातीला उमेदवारांना 1 वर्षांसाठी कंत्राटावर घेतले जाईल. जर उमेदवाराची कामगिरी चांगली असेल, तर त्याचा कालावधी 2 वर्षांनी वाढवण्यात येईल, म्हणजेच किमान 3 वर्षांसाठी कंत्राटाची संधी असेल.

अर्ज शुल्क आणि वेतन
SC/ST/PWD उमेदवारांसाठी – ₹150
इतर उमेदवारांसाठी – ₹750
या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 30,000 रुपये वेतन दिले जाणार आहे. सरकारी बँकेत नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ही संधी गमावू नये!

तसेच, अशाच नवीन भरती च्या जाहिराती बद्दल जाणून घेण्यासाठी news24.mahabharti.in ला भेट देत चला.

Leave A Reply

Your email address will not be published.