पवित्र पोर्टलवर मुलाखतीची सक्ती!-Interviews Must on Pavitra Portal!
Interviews Must on Pavitra Portal!
शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरून (Pavitra Portal) खासगी संस्थांना उमेदवारांच्या मुलाखतीसाठी आता थेट ऑनलाइन पद्धतीने मुलाखत फिक्स करावी लागणार हाय. यासाठी संस्थांनी पोर्टलवर लॉगिन करून ठराविक प्रोसेस पूर्ण करणं अनिवार्य ठेवलं गेलं हाय.
ज्या शाळेसाठी उमेदवारांची शिफारस झाली हाय, त्या संस्थांना आता मुलाखतीचं सेड्युल थेट पोर्टलवरूनच करावं लागणार. पवित्र पोर्टलवर दिलेल्या सूचनांप्रमाणेच काम केलं तरच पुढच्या निवड प्रक्रियेसाठी पात्रता राहणार.
काय करायचं व्यवस्थापनानं?
-
पोर्टलवर लॉगिन करा
-
Applicant Interview Status मेनूमधून Scheduled Interview वर क्लिक करा
-
सिलेक्ट राउंडमध्ये Phase-2 Regular Round निवडा
-
शिक्षणाचा स्तर निवडा – प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा अध्यापक विद्यालय
-
सिलेक्ट एड टाईप – आपलं पद
-
सिलेक्ट मिडियम – माध्यम
-
पोस्ट – नेमकं पद
-
सब्जेक्ट टाईप – विषय
-
त्यानंतर मुलाखतीचा दिनांक आणि स्थळ टाका
यानंतर ‘Search’ बटणावर क्लिक केल्यावर मुलाखतीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची यादी दिसेल. यादीतील उमेदवारांसमोरचा चेक बॉक्स क्लिक करून Schedule Interview वर क्लिक करा. पुढे “Yes” बटण दाबताच उमेदवाराच्या मोबाईलवर SMS जाईल.
मुलाखतीचं वेळापत्रक बदलायचंय का?
तर “Rescheduled Interview” ऑप्शन वापरा. तेव्हाही वरीलच प्रोसेस पुन्हा करा.
उमेदवार लॉगिन करून Application Form > Applicant Recommended Status वर जाऊन
-
इंटरव्ह्यू टाईप – With Interview
-
राउंड – Phase-2 Regular Round
-
आणि Submit
केल्यानंतर Recommended Institute List मध्ये शाळेचं नाव, ठिकाण आणि मुलाखतीची तारीख दिसेल.