Infosys InStep या कंपनीत इंटर्नशिप ची संधी !-InStep Internship 2025!
InStep Internship 2025!
Infosys ची InStep Internship ही काही साधी सरळ इंटर्नशिप नाही बरं का! Vault Firsthand या संस्थेनं पाच वर्षं सलग जगातली नंबर वन इंटर्नशिप म्हणून तिला गौरवलेलं आहे. आता 2025 मध्ये ही योजना फ्रेशर्ससाठी आणखी खास ठरणार आहे – कारण यामुळं केवळ तंत्रज्ञान नव्हे तर प्रोफेशनल ग्रोथ, सांस्कृतिक अनुभव आणि ग्लोबल नेटवर्किंग या सगळ्याची मजा एकत्र मिळते!
ग्लोबल दर्जाची संधी, भारतात अनुभवायला मिळणारी!
Infosys InStep ही जगभरातल्या 220 हून अधिक विद्यापीठांमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणते – मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी, लिबरल आर्ट्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले विद्यार्थी इथे एकत्र येतात आणि एकमेकांकडून शिकतात.
इथे तुम्हाला AI, मशीन लर्निंग, सायबरसुरक्षा, IoT आणि सस्टेनेबिलिटीसारख्या नव्या तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळते – तेही थेट प्रोजेक्टवर! वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञ मंडळी तुमचं मार्गदर्शन करतात.
याशिवाय, संशोधन, पेटंट, पब्लिकेशन्स अशा गोष्टींमध्येही सहभाग घेण्याची संधी असते. म्हणजे फक्त शिकायचं नाही, काहीतरी नवीन निर्माण करायचं असतं!
भारतीय संस्कृतीचा थेट अनुभव – कामासोबत मजा आणि शिकवण
इंटर्न्स Infosys च्या हिरव्यागार कँपसवर राहतात – वेगवेगळ्या प्रकारचं जेवण, भारताची संस्कृती, आणि वीकेंडला फिरायला जायची मजा! काम, शिकणं आणि सांस्कृतिक अनुभव – सगळं एकत्रच!
सोयी-सुविधा आणि फायदे – InStep का वेगळी ठरते?
Infosys आपल्या इंटर्न्सना सगळ्या बाजूंनी सपोर्ट करतं. यात तुम्हाला मिळतं:
- स्टायपेंड (मानधन)
- विमानाची तिकिटं
- व्हिसा शुल्क
- राहणं
- गाडीसह ड्रायव्हर
- हेल्थ इन्शुरन्स आणि फिटनेस क्लब मेंबरशिप
डिजिटल युगात करिअर घडवायचंय? तर हीच संधी!
जग झपाट्यानं डिजिटल होतंय आणि त्यामुळे नव्या तंत्रज्ञानात कुशल प्रोफेशनल्सची गरज वाढतेय. Infosys InStep ही योजना फ्रेशर्सना तशीच कौशल्यं देते – जगात टिकून राहण्यासाठीची!
नाविन्य, टीमवर्क, आणि सांस्कृतिक समावेश यामुळे Infosys InStep Internship 2025 ही इतर सगळ्यांपेक्षा खूपच खास आणि उठून दिसणारी संधी आहे.