नवीन जाहिरात ! IOCL मध्ये भरती; मिळणार १४०००० इतका पगार ! उत्तम संधी लवकर करा अर्ज

Indian Oil Recruitment 2025

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इंडियन ऑइलने फायनान्स क्षेत्रासाठी असिस्टंट ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.

Indian Oil Recruitment 2025

या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ मार्च २०२५ आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे, तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळणार आहे. अर्जासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण असणे आवश्यक आहे.

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४०,००० ते १,४०,००० रुपये मासिक वेतन मिळेल. यासोबत महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), वैद्यकीय सुविधा आणि अन्य भत्ते मिळणार आहेत. उमेदवारांची निवड CA/CMA इंटरमीडिएट परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल, तसेच पुढील टप्प्यात ग्रुप डिस्कशन (GD), ग्रुप टास्क (GT), आणि पर्सनल इंटरव्ह्यू (PI) घेतले जातील. या सर्व प्रक्रियेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे.

ही भरती प्रक्रिया स्थिर आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. उच्च वेतन आणि विविध भत्त्यांसह फायनान्स क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देणारी ही नोकरी इंडियन ऑइलसारख्या नामांकित कंपनीत काम करण्याचा उत्तम पर्याय ठरू शकते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज भरून ही संधी मिळवावी. अधिक माहितीसाठी इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.