१०वी पासला मर्चंट नेव्हीत नोकरीची संधी, १८०० पदांची मोठी भरती सुरु, भरपूर पगार, अर्ज सुरु!

Indian Merchant Navy Bharti 2025

Indian Merchant Navy Bharti 2025 : मित्रांनो 10वी/12वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी! भारतीय मर्चंट नेव्ही मध्ये “Deck Rating, Engine Rating, Seaman, Electrician, Welder/ Helper, Mess Boy, Cook” या पदांची एकूण १८०० रिक्त जागांची मेगा भरती होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२५ आहे.  हि भरती म्हणजे 10वी/12वी पास उमेदवारांसाठी खर्च एक चांकली नोकरीच संधी असणार आहे. 

भारतीय मर्चंट नेव्हीने “डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सिमन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/ हेल्पर, मेस बॉय, कूक” या विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती अधिसूचना जारी केली आहे. एकूण 1800 जागा उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या ऑनलाइन पत्त्यावर 10 फेब्रुवारी 2025 च्या आधी आपला अर्ज सादर करावा.

Indian merchant Navy Bharti 2025

रिक्त जागांचा तपशिल : भारतीय मर्चंट नेव्हीने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय, कुक या पदांसाठी एकूण 1800 जागा उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार निर्धारित केली आहे, त्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून अधिक माहिती मिळवावी. वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट indianmerchantnavy.com ला भेट द्यावी.

तसेच, इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांना भारतीय नौदलाच्या वेबसाइट www.sealanemaritime.in वर नोंदणी करावी लागेल. ई-मेल पत्ता, मोबाइल क्रमांक यांसारखी माहिती अनिवार्य आहे आणि ती भरणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्जाचा प्रिंट आउट घ्यावा आणि मुलाखतीसाठी हजर होताना तो सोबत आणावा.

कशी होणार निवड आणि परीक्षा : लिखित परीक्षेमध्ये 100 वस्तुनिष्ठ प्रकाराचे बहुपर्यायी प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण दिला जाईल. न सोडवलेल्या प्रश्नांसाठी कोणतेही गुण दिले जाणार नाहीत. परीक्षेची पातळी 10वी आणि 12वी इयत्तेच्या स्तरावर असेल. परीक्षा द्विभाषिक पद्धतीने, म्हणजेच इंग्रजी आणि हिंदीमध्ये घेतली जाईल. ऑनलाइन अर्ज फॉर्म भरताना, उमेदवाराने आपले परीक्षाकेंद्र काळजीपूर्वक निवडावे. निवडलेले परीक्षाकेंद्र कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी केंद्राची निवड काळजीपूर्वक करावी आणि ती अर्जात अचूक नमूद करावी.

अर्ज कसा करावा? : वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज सादर करावा. या भरतीमध्ये आपल्याला पगार पन्नास हजार इतका राहणार आहे. तसेच अर्ज शुल्क १०० रुपये इतकं असणार आहे.  या तारखेनंतर आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

तसेच, सरकारी नोकरीच्या इतर जाहिरातीच्या माहिती मिळविण्यासाठी आमच्या news24.mahabharti.in ला रोज भेट दया.

 

2 Comments
  1. आकाश नितीन बोरकर says

    पंप मेकॅनिकल आयटीआय केलेला आहे तो पण फॉर्म भरू शकतो का

  2. Rohit ravi gaikwad says

    Job niyr bay aahe
    Ka

Leave A Reply

Your email address will not be published.