10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी!! भारतीय सैन्यात विविध पदांची भरती सुरु !

Indian Army Jobs – Opportunity for 10th Pass!

देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्यात (Indian Army) 10वी पास उमेदवारांसाठी भरती जाहीर झाली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर भरती सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

 Indian Army Jobs – Opportunity for 10th Pass!

अग्निवीर भरती 2025 – अर्ज करण्याची शेवटची तारीख?
भारतीय सैन्यात अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 11 मार्च 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2025 आहे. म्हणजेच, इच्छुक उमेदवारांकडे फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

पात्रता आणि वयोमर्यादा कोणती?
वय: अर्जदाराचे वय 17 ते 21 वर्षे असावे. 1 ऑक्टोबर 2025 ही आधारभूत तारीख मानून वयोमर्यादा ठरवली जाईल.

शैक्षणिक पात्रता:
जनरल ड्युटी (GD): किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
ट्रेड्समन: 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
जर तुमच्या वयाचा आणि पात्रतेचा निकष जुळत असेल, तर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकता.

काय आहेत भरती होणारी पदे?
अग्निवीर योजनेअंतर्गत खालील पदांसाठी भरती होणार आहे:
अग्निवीर (GD, टेक्निकल, क्लर्क, स्टोअर कीपर, ट्रेड्समन)
सैनिक फार्मा
सैनिक टेक्निकल नर्सिंग असिस्टंट
महिला पोलिस भरती
हवालदार (सर्वेक्षक आणि शिक्षण)
जेसीओ (धार्मिक शिक्षक, केटरिंग)
ऑटोमेटेड कार्टोग्राफर

अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन की ऑफलाइन?
ही भरती पूर्णपणे ऑनलाइन आहे.
अर्ज करण्यासाठी भारतीय सैन्याची अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट द्या.
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करावी लागतील.
अर्ज शुल्क ₹250 आहे.
उमेदवार एकाच वेळी दोन पदांसाठी अर्ज करू शकतो.

भरती प्रक्रिया – निवड कशी होईल?
लेखी परीक्षा: भारतीय सैन्य अग्निवीर भरतीसाठी प्रवेश परीक्षा जून महिन्यात होण्याची शक्यता आहे.
शारीरिक चाचणी: निवड झालेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाईल.
मेडिकल टेस्ट: अंतिम टप्प्यात आरोग्य तपासणी (Medical Test) केली जाईल.
निवड प्रक्रिया पूर्ण: शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड होईल.
ही परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाणार आहे, त्यात मराठी, हिंदी आणि इंग्रजीचा समावेश आहे.

अग्निवीर साठी फायदे काय आहेत?
दरमहा 40,000 रुपयांपर्यंत पगार मिळणार.
48 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल.
चार वर्षांच्या सेवेनंतर 25% अग्निवीरांना भारतीय सैन्यदलात कायमस्वरूपी संधी.
सेवा निवृत्तीच्या वेळी ‘सेवा निधी’ म्हणून 10-12 लाख रुपये मिळतील.

नोकरीची संधी दवडू नका!
भारतीय सैन्यात भरती होणे हे एक सन्माननीय आणि देशसेवेचे कार्य आहे. तुम्ही देशसेवा करण्याची संधी शोधत असाल, तर ही सुवर्णसंधी दवडू नका! इच्छुक उमेदवारांनी तत्काळ अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरावा.
तुमच्या माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी व्हॉट्सअप/टेलिग्राम ग्रुप जॉइन करा!
9322515123 वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन अॅप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा!

Leave A Reply

Your email address will not be published.