10 वी पास झालेल्यासाठी भारतीय टपाल विभागात भरतीसुरू – नोकरीची सुवर्णसंधी!
India Post Recruitment 2025 !
जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे! भारतीय टपाल विभागात (India Post) ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी भरती सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा आवश्यक नाही. एकूण 21,413 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा.India Post Recruitment 2025
या भरती प्रक्रियेत BPM (ब्रांच पोस्टमास्टर), ABPM (सहाय्यक शाखा पोस्टमास्टर) आणि डाक सेवक या पदांचा समावेश आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2025 आहे. अर्जामध्ये सुधारणा करण्याची संधी 6 मार्च ते 8 मार्च 2025 दरम्यान दिली जाईल.
उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (गणित व इंग्रजी विषयांसह). तसेच, अर्ज केलेल्या भागातील स्थानिक भाषा 10वीपर्यंत शिकलेली असावी आणि प्राथमिक संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
ही भरती परीक्षेशिवाय केली जाणार असून, उमेदवारांची निवड 10वीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून केली जाईल. वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे ठेवण्यात आली असून, SC/ST, OBC आणि PWD उमेदवारांना अतिरिक्त वयाची सूट दिली जाईल.
निवड झालेल्या उमेदवारांना BPM पदासाठी ₹12,000 ते ₹29,380 आणि ABPM/GDS पदांसाठी ₹10,000 ते ₹24,470 प्रतिमाह वेतन मिळेल. अर्ज शुल्क ₹100 आहे, मात्र महिला, SC/ST, PWD आणि Transwomen उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे.
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट: 🔗indiapostgdsonline.gov.in
संधी गमावू नका! त्वरित अर्ज करा आणि सरकारी नोकरी मिळवा!
10th pass jobs
आम्हाला पण नोकरीची अत्यंत गरज आहे.
12th paas job
Post jab
जॉब पाहिजे