लवकरच ! MPSC अंतर्गत PSI भरती सुरु !

Increase PSI Vacancies!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट ‘ब’ पोलिस उपनिरीक्षक (PSI) भरतीतील जागा वाढवण्याची मागणी करत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात शास्त्री रस्त्यावर आंदोलन केले. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, PSI पदांसाठी निघालेल्या जागांची संख्या फारच कमी असून सरकार विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे.

Increase PSI Vacancies!

PSI भरती प्रक्रियेत बदल
फेब्रुवारी २०२४ मध्ये PSI भरतीसाठी जाहिरात निघण्याची आणि जून २०२४ मध्ये परीक्षा होण्याची अपेक्षा होती. सुरुवातीला राज्य सरकारने ४४९ पदांसाठी मागणीपत्र दिले होते. मात्र, निवडणुकांमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आणि अखेर ऑक्टोबर २०२४ मध्ये केवळ २१६ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. यामुळे २२५ जागा अचानक कमी झाल्या, याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसला आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि संताप
राज्यातील सुमारे १२ लाख विद्यार्थी PSI परीक्षेसाठी अर्ज करतात. अशा परिस्थितीत केवळ २१६ जागांसाठी परीक्षा घेणे अन्यायकारक आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी पुण्यासारख्या शहरात येऊन वर्षानुवर्षे मेहनत घेतात, मात्र जागांची संख्या कमी झाल्याने त्यांचे स्वप्न अपूर्ण राहण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारने PSI जागा वाढवण्याचा निर्णय घ्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

पोलिसांची कारवाई आणि आंदोलनाचा घटनाक्रम
विद्यार्थ्यांनी मागील दोन महिन्यांपासून परवानगीसाठी पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांना निवेदन दिले होते, परंतु परवानगी नाकारण्यात आली. अखेर विद्यार्थ्यांनी संविधानिक मार्ग अवलंबत गुरुवारी (ता. २७) शास्त्री रस्त्यावर आंदोलन केले. दुपारी ३:४५ वाजता आंदोलन सुरू झाले आणि सायंकाळी ५:३० वाजता पोलिसांचा फौजफाटा आंदोलनस्थळी दाखल झाला. यावेळी सुमारे १२ ते १५ आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

राज्यसेवा परीक्षेतील बदल आणि विद्यार्थ्यांचे मत
गेल्या दोन वर्षांपासून PSI जागांची संख्या कमी होत आहे. शिवाय, राज्यसेवा परीक्षेत वर्णनात्मक स्वरूप लागू झाल्याने हजारो विद्यार्थी स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे PSI भरतीसाठी सरसकट दोन वर्षे वयोमर्यादेत वाढ द्यावी, अशी विद्यार्थ्यांचीही मागणी आहे.

“सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो तरुणांसाठी PSI जागा वाढवणे आवश्यक आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.