नोकरीची सुवर्ण संधी ! IDBI बँकेत पदभरती; एकूण ६५० पद ! जाणून घ्या माहिती
IDBI Bank Recruitment; Notification issued for 650 posts!!
IDBI बँकेने ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अर्ज प्रक्रिया १ मार्चपासून सुरू होणार असून, इच्छुक उमेदवार १२ मार्चपर्यंत बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर idbibank.in जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी एकूण ६५० पदे उपलब्ध आहेत.
एकूण पदांपैकी २६० पदे सामान्य प्रवर्गासाठी, १७१ पदे ओबीसीसाठी, १०० पदे एससीसाठी, आणि ४५ पदे एसटीसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. ही भरती पुणे, भोपाळ, दिल्ली, चंदीगड आणि इतर अनेक शहरांसाठी होत आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय २० ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच, ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी प्रवर्गासाठी ₹१०५०/-, तर अनुसूचित जाती, जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी ₹२५०/- इतके आहे. शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरता येईल.
अर्ज प्रक्रिया:
अधिकृत वेबसाइट idbibank.in ला भेट द्या.
होम पेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा.
“करंट ओपनिंग” विभागात ज्युनियर असिस्टंट मॅनेजर लिंक निवडा.
आवश्यक तपशील भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क भरून अर्ज सादर करा.
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड सीबीटी (CBT) परीक्षेद्वारे केली जाईल. परीक्षेत यश मिळवलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह प्रकारात होणार असून मायनस मार्किंग लागू असेल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासावी.