खुशखबर !! बारावी निकाल जाहीर झाला ! या लिंक वर क्लिक करून निकाल डाउनलोड करा !-HSC Result Declared !

HSC Result at 1 PM Today!

खुशखबर !! राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी–मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून निकाल डाउनलोड करा. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांतून एकूण १ लाख ६८ हजार १९६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

HSC Result at 1 PM Today!

निकाल बघितल्यावर जर कोणाला आपले गुण पडताळून बघायचे असतील, उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी असेल किंवा पुनर्मूल्यांकन करायचं असेल, तर मंडळाकडे ६ मे ते २० मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

निकाल पाहण्यासाठी या लिंक वापरा:

https://results.digilocker.gov.in

https://mahahsscboard.in

http://hscresult.mkcl.org

टीप: पुनर्मूल्यांकन करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं बंधनकारक आहे. छायाप्रत मिळाल्यावर ५ ऑफिस दिवसात ऑनलाइन अर्ज करून पुढील प्रक्रिया करता येईल.

पुढच्या संधी:
ही परीक्षा नापास किंवा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या तीन प्रयत्नांसाठी संधी दिल्या जातील –

  • जून-जुलै २०२५
  • फेब्रुवारी-मार्च २०२६
  • जून-जुलै २०२६

या श्रेणीसुधार परीक्षांसाठी ७ मेपासूनच ऑनलाइन फॉर्म भरता येतील. यात पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार घेणारे व खासगी उमेदवार सहभागी होऊ शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.