नोकरीची संधी !! HPCL मध्ये ६३ पदांसाठी भरती ; संधी गमावू नका! | HPCL Recruitment 2025 – Golden Opportunity!

HPCL Recruitment 2025 – Golden Opportunity!

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL), मुंबई येथे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पदांच्या ६३ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ३० एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी आहे. ही भरती केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनीत होणार असून, पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा.

HPCL Recruitment 2025 – Golden Opportunity!

रिक्त पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता
या भरती अंतर्गत विविध शाखांसाठी इंजिनीअरिंग डिप्लोमाधारक उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (मेकॅनिकल) – ११ पदे (मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा आवश्यक)
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल) – १७ पदे (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा आवश्यक)
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इन्स्ट्रुमेंटेशन) – ६ पदे (इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल/इन्स्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा आवश्यक)
केमिकल इंजिनीअर – १ पद (केमिकल टेक्नॉलॉजी डिप्लोमा आवश्यक)
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (फायर अँड सेफ्टी) – २८ पदे (सायन्स पदवी आणि फायर अँड सेफ्टी डिप्लोमा आवश्यक)

वयोमर्यादा आणि अनुभव
उमेदवारांचे वय ३० एप्रिल २०२५ रोजी १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे.
डिप्लोमा अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.
अनुभवी उमेदवारांनाही संधी उपलब्ध आहे.

वेतन आणि निवड प्रक्रिया
वेतनश्रेणी: ₹३०,०००/- ते ₹१,२०,०००/- प्रति महिना. (वार्षिक CTC अंदाजे ₹१०.५८ लाख)

निवड प्रक्रिया:
कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT)
ग्रुप टास्क / ग्रुप डिस्कशन
स्किल टेस्ट आणि वैयक्तिक मुलाखत
मेडिकल टेस्ट आणि फिजिकल फिटनेस चाचणी (PFET)

CBT परीक्षेचा अभ्यासक्रम
जनरल अॅप्टिट्यूड: इंग्रजी भाषा, गणितीय अभियोग्यता, लॉजिकल रिझनिंग आणि डेटा इंटरप्रिटेशन.
टेक्निकल / प्रोफेशनल नॉलेज: अर्ज केलेल्या पदानुसार तांत्रिक प्रश्न.

नोकरीचे ठिकाण आणि सेवा अटी
निवडलेल्या उमेदवारांना HPCL च्या रिफायनरी डिव्हीजन/सबसिडीअरीज/जॉइंट व्हेंचर किंवा भारत सरकारच्या विविध विभागांत नियुक्त केले जाईल.
निवड झाल्यानंतर उमेदवारांना १ वर्षाचा प्रोबेशन कालावधी असेल.

अर्ज प्रक्रिया आणि शुल्क
अर्जाची शेवटची तारीख: ३० एप्रिल २०२५ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
अर्ज फी: ₹१००० + ₹१८० GST (SC/ST/PWD उमेदवारांसाठी अर्ज फी नाही)
अधिकृत वेबसाइट: www.hindustanpetroleum.com
शंका असल्यास careers@hpcl.in वर ई-मेल करा.

संधीचा लाभ घ्या – त्वरित अर्ज करा!
HPCL मध्ये स्थिर आणि उच्चप्रतीच्या करिअरसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत ऑनलाईन अर्ज करून आपले भविष्य सुरक्षित करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.