हिवाळी अधिवेशनासाठी हवेत लिपीक-टंकलेखक, पदभरती सुरु, असा करा अर्ज..
hiwali adhiveshan nagpur jobs
विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन यंदा ५ दिवसाचे म्हणजे १६ ते२१ डिसेंबर याच दरम्यान होणार आहे. विदर्भाचे प्रश्न सुटावे त्यावर विधिमंडळात चर्चा व्हावी म्हणून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले जाते. त्याची गांभीर्य दिवसेंदिवस कमी होत गेले. आता तर ती केवळ औपचारिकता म्हणून हे अधिवेशन अक्षरश: उकले जाते. यदा सरकार नवीन आहे हे कारण देत अधिवेशन पाच दिवसाचे होणार,अशी माहिती आहे. त्यामुळे यातून विदर्भाच्या हाताला काही लागण्याची शक्यता कमीच आहे. असे असताना पण या अधिवेशनात उमेदवारांना नोकरीची एक संधी मिळाली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशन कालावधीकरिता सचिवालयात लिपीक टंकलेखकांची एकूण १० पदे एस-६ (१९,९००-६३,२००) या वेतन संरचनेनुसार व अधिक नियमानुसार मिळणाऱ्या भत्त्यासह तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. लिपीक-टंकलेखक या पदाकरिता शैक्षणिक अर्हता बारावी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखक ४० शब्द प्रति मिनिट तसेच एमएससीआयटी किंवा इतर समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (hiwali adhiveshan nagpur jobs)
याची परीक्षा १२ डिसेंबरला सकाळी ११:३० वाजता विधानभवन, नागपूर येथे घेण्यात येईल. खुला संवर्गासाठी वय १८ ते ३८ वर्षे, मागास वर्गासाठी वय १८ ते ४३ वर्षे (५ वर्ष नियमाप्रमाणे शिथीलक्षम) राहील. ज्यांनी लिपीक-टंकलेखक पदाकरिता अर्ज केला आहे, अशा सर्व उमेदवारांची टंकलेखन चाचणी गुरुवारी घेण्यात येईल.
सर्व उमेदवारांनी चाचणीसाठी येताना सोबत मूळ कागदपत्रांसह फोटो, जात प्रमाणपत्र, टी. सी. मार्कलिस्ट व इतर शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.