स्पर्धा परीक्षा हेच खरं साधन ; स्पर्धेतून घडतायत पोरं!-Groomed by Competitions!

Groomed by Competitions!

शालेय शिक्षण म्हणजे फक्त साक्षर करणं – हेच आजच्या शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट हाय, असं ठसक्यात मत मांडलय परभणीचे शिक्षण सेवक नितीन लोहट यांनी. ते ‘सकाळ’ ऑफिसात आपला अनुभव शेअर करत होते.

Groomed by Competitions!ते म्हणाले, “कर्मवीर भाऊराव पाटलांनी समाज पुढं न्यावा म्हणून शाळा काढल्यात. पण आत्ताचं युग हे एकदम अविश्वासाचं झालय. मोठ्या संस्था जाहिराती करतायत आणि पालक फसतायत. पण शिक्षण हे साक्षरतेपुरतं मर्यादित राहिलंय.”

लोहटांनी एमए, बीएड केलं, पण नोकरी न मिळाल्यामुळे त्यांनी ज्ञानदानाचं काम सुरु केलं. २०००-०१ च्या सुमारास त्यांनी गरजू पोरांना शिकवायला सुरुवात केली. रहाणं, जेवणं, वर्ग – सगळं नियोजन स्वतः केलं.

त्यानंतर २००२ साली मातोश्री जिजाऊ ग्रामविकास मंडळ उभं केलं आणि छोटंसं वसतिगृह सुरु केलं. सुरुवातीला फक्त १० पोरं होती, पण २००६ पर्यंत ती संख्या ६०० वर गेली.

पुढे त्यांनी विनाअनुदानित शाळा काढली. ती शाळा २०१२ मध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर आली. आता त्यांचं ज्ञानाचं साम्राज्य – २ वसतिगृहं, १ शाळा, २ ज्युनिअर कॉलेज आणि १ निवासी शाळा – एवढं विस्तारलंय.

स्पर्धा परीक्षा हेच खरं साधन
लोहट म्हणतात, “पोरं तयार होतात ती लहान वयातच. म्हणूनच सहावीपासून नीट, जेईई, क्लॅटसारख्या परीक्षांची तयारी सुरु करतो. फिजिक्स, मॅथ, केमिस्ट्री, बायोलॉजी – सगळं शिकवतो आणि वेळेचंही काटेकोर नियोजन असतं.”

त्यामुळे पाचवी-आठवीतल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम कामगिरी केली. अमेरिकन विद्यार्थी, कलाकार, राजकीय नेते यांची व्याख्यानं त्यांना मिळतात. पोरांना अनुभव देणं हेच त्यांचं काम आहे.

सेवा हेच ब्रीदवाक्य
लोहट आजही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १०० पोरांना पाचवी ते दहावीपर्यंत मोफत शिकवतात. त्यांचे संस्थांमधून जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, रामरावजी लोहट स्कूल, जिजाऊ आयटीआय अशा अनेक ठिकाणी शिक्षण सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.