केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ; महागाई भत्ता आणि सवलतीत २ % वाढ !-Great News for Central Employees!
Great News for Central Employees!
केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिलासा देत महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलतीत (DR) २% वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या वाढीचा लाभ ४८.६६ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६६.५५ लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून DA ५३% वरून ५५% होणार आहे. मात्र, या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ६,६१४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये DA ३% वाढवण्यात आला होता, जो १ जुलै २०२४ पासून लागू झाला होता.
इलेक्ट्रॉनिक्स घटकांसाठी PLI योजना
केंद्रीय मंत्रिमंडळाने नॉन-सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स घटकांसाठी उत्पादन-संलग्न प्रोत्साहन (PLI) योजनेला मंजुरी दिली आहे. यासाठी सरकार २२,९१९ कोटी रुपये खर्च करणार आहे. या योजनेमुळे ५९,३५० कोटी रुपयांची गुंतवणूक, ४.५६ लाख कोटींचे उत्पादन आणि ९१,६०० प्रत्यक्ष रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे.
खत अनुदान योजना
केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२५ च्या खरीप हंगामासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅश (P&K) खतांवरील अनुदान (NBS) मंजूर केले आहे. यासाठी सरकार ३७,२१६.१५ कोटी रुपये खर्च करणार आहे.
सरकारी योजनांच्या अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या!