शेतकऱ्यांना मोबाईलवरूनच मिळणार सरकारचं थेट अनुदान!-Govt Subsidy Straight to Your Phone!

Govt Subsidy Straight to Your Phone!

विदर्भात राबणाऱ्या शेतकऱ्यांनो, आता बियाणं असो, सिंचन व्यवस्था असो की ट्रॅक्टर, सगळ्यासाठी थेट अनुदान मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवqरून तुम्ही मोबाईलवरूनच सगळी प्रक्रिया पार पाडू शकता. आधार, ७/१२ उतारा, बँकेचं पासबुक, खरेदी पावती ही कागदपत्रं अपलोड करा, आणि एसएमएस-ईमेलद्वारे तुमच्या अर्जाची माहिती वेळोवेळी मिळवा.

Govt Subsidy Straight to Your Phone!

या योजनेंतर्गत प्रधानमंत्री सिंचन योजनेपासून ते फळबाग लागवडीपर्यंत शेकडो उपक्रम आहेत. काही योजनांमध्ये तर १००% पर्यंत अनुदान मिळतं – उदाहरणार्थ आंबा, संत्रा, मोसंबीसाठी फळबाग लागवड योजना. ट्रॅक्टर, अवजारे यासाठी ४०-६०%, ठिबक/तुषार सिंचनासाठी २५-५५% पर्यंत अनुदान मिळतंय.

काही योजना लॉटरी प्रणालीवर आधारित आहेत – लॉटरी लागल्यानंतर दहा दिवसांत कागदपत्रं अपलोड करा, आणि त्यानंतर विभागाकडून पूर्वसंमती पत्र मिळालं की ३० दिवसांत खरेदी करा. खरेदीची माहिती अपलोड केल्यावर खात्री करून थेट तुमच्या खात्यात अनुदान जमा केलं जातं.

म्हणजे काय भाऊ, आता कुठं तरी खेटे मारायची गरज नाही – सरकार तुमच्या मोबाईलमध्ये आलंय! वेळ वाया न घालवता, आजच Mahadbt पोर्टलवर अर्ज करा आणि तुमचं शेतीचं स्वप्न थेट मदतीसह साकार करा.

Leave A Reply

Your email address will not be published.