राज्यात महाभरती लवकरच!-Govt Mega Hiring Soon!

Govt Mega Hiring Soon!

राज्यात सरकारी नोकरीसाठी वाट पाहणाऱ्यांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केलं की, राज्य सरकार लवकरच महाभरती करणार आहे.

Govt Mega Hiring Soon!सर्व विभागांना १५० दिवसांचे उद्दिष्ट देण्यात आलं असून, त्यात आकृतीबंध, नवीन भरती नियम, आणि १००% अनुकंपा भरतीचा समावेश आहे. ही उद्दिष्टं पूर्ण झाल्यावर रिक्त पदांची स्पष्ट माहिती मिळेल आणि त्यानंतर महाभरती होणार आहे.

या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातींतील रिक्त पदांच्या भरतीबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. सरकारने याआधी ७५ हजार पदांवर भरती केली होती आणि आता आणखी मोठ्या प्रमाणावर भरतीसाठी तयारी सुरू आहे. जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या पण २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पदं अधिसंख्य करण्यात आली आहेत. त्यांना पदोन्नती मिळणार नाही, पण सेवेतून काढण्यातही येणार नाही.

सफाई कामगारांच्या पदांवरील सर्वोच्च न्यायालयाची स्थगितीही हटवण्यात आली आहे. त्यामुळे आता वारसा हक्कानं ही पदं भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांबाबतही सरकारने कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. यासाठी पुनर्पडताळणी होणार असून दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापराचा विचार सुरू आहे, आणि हे त्वरित आणि पारदर्शक प्रमाणपत्र देण्यासाठी सचिवांचा विशेष गट स्थापन करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.