हवाई दलात तब्बल १५३ विविध पदाची भरती सुरु !
Govt Job Alert Air Force Hiring!
तरुणानं साठी उत्तम नोकरीची संधी ! भारतीय हवाई दलात विविध पदाच्या भरती सुरु आहे . एकूण १५३ रिक्त जागा आहे . या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२५ ही आहे . इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर दिलेली pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचून मग अर्ज करावा . अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
हवाई दलात भरती सुरू झालीये राव! हिंदुस्थानच्या एअर फोर्समध्ये तब्बल १५३ जागा मोकळ्या आहेत आणि सरकार आता तिथं भरती करायला निघालंय. ही भरती सी ग्रुपमध्ये होणार आहे, म्हणजे थेट ऑफिसर नाही, पण सरकारच्या कामात बरोबरीनं हातभार लावणाऱ्या पदांवर माणसं लागणार आहेत.
या भरतीत जे पदं आहेत त्यामध्ये हिंदी टायपिंग करणारे (टायपिस्ट), स्टोअरमध्ये सामान सांभाळणारे (स्टोअर कीपर), गाड्या चालवणारे ड्रायव्हर (MTD), स्वयंपाक करणारे कुक, रंगकाम करणारे पेंटर, झाडू-पोछा आणि साफसफाई करणारे हाऊस कीपिंग स्टाफ, कपडे धुणारे लॉण्ड्रीमॅन, मेसमधली कामं करणारे मेस स्टाफ आणि सगळ्या गोष्टींमध्ये हातभार लावणारे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) अशा विविध प्रकारच्या पदांचा समावेश आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे १५ जून २०२५. त्यामुळे ज्यांना सरकारी नोकरीची संधी हवी आहे, त्यांनी वेळ न घालवता अर्ज भरायला सुरुवात करावी. अर्ज करणाऱ्याचं वय किमान १८ वर्षं आणि कमाल २५ वर्षं असायला हवं. काही पदांसाठी १०वी, १२वी पास, किंवा टायपिंगचं प्रशिक्षण लागणार आहे – त्यामुळे जाहिरात नीट वाचावी.
भरतीबाबत सविस्तर आणि अधिकृत माहिती पाहायची असेल, तर हवाई दलाची वेबसाइट – indianairforce.nic.in इथे भेट द्या. सगळे तपशील तिथं दिले आहेत.
तर मंडळी, गावाकडचे हुशार तरुण, ही एक सुवर्णसंधी आहे. सरकारची नोकरी, तीही देशाच्या सुरक्षा यंत्रणेत – ही गोष्ट अभिमानाची आहे. आता वेळ वाया घालवू नका. तयारी करा आणि आपलं नशीब आजमावायला विसरू नका!