१५०० रुपये मिळाले, पण २१०० कुठं?-Got 1500, But Where’s 2100?

Got 1500, But Where’s 2100?

सरकारनं सांगितलं होतं, “लाडक्या बहिणींना दर महिना २,१०० रुपये देऊ!” पण आता आठ महिने झाले हायेत, अजूनही बायांचं खात्यात तेवढं नाही आलंय!

Got 1500, But Where’s 2100?नाशिक जिल्ह्यातल्या महिलांनी सांगितलं की, जूनच्या महिन्याचा हप्ता खात्यात जमा झालाय, पण केवळ १,५०० रुपयेच. लोक म्हणत होते २,१०० रुपये येणार, पण प्रत्यक्षात पंधराशेच टाकलेत. आता ह्यामुळे बायामाणसांत गोंधळ अन् नाराजी वाढतेय.

सरकार दुसऱ्या खात्यांतून निधी वळवतेय, हे समोर आलंय, पण योजनेच्या मूळ वचनाची पूर्तता झालीच नाही. मार्चच्या बजेटमध्ये सुद्धा वाढीव हप्त्याचं नावगाव नव्हतं.
जुलैच्या हप्त्याची काय स्थिती हाय, हेही अजून कळत नाही.

महायुतीला पुन्हा सत्तेवर आणायला महिलांचा मोठा वाटा होता. आता त्या महिलांनीच विचारायला सुरुवात केलीय – “आम्ही दिला पाठिंबा, सरकार देणार का वचनपूर्ती?”

वचन २१००चं, जमा फक्त १५००च – बहिणी आता विचारतात थेट!

Leave A Reply

Your email address will not be published.