संधी सरकारी नोकरीची !! १०वी पाससाठी ST महामंडळात भरती सुरु; ४४६ रिक्त पद ! त्वरित अर्ज करा

Golden Opportunity in MSRTC – Govt Job for 10th Pass!

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (MSRTC) नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नाशिक विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण ४४६ रिक्त जागांसाठी ही भरती होणार असून, इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.

Golden Opportunity in MSRTC – Govt Job for 10th Pass!

या भरतीसाठी १०वी उत्तीर्ण तसेच संबंधित क्षेत्रात आयटीआय प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांना संधी आहे. यामध्ये व्होकेशनल (अकाउंट्स आणि ऑडिटिंग), मॅकेनिक मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर आणि पेंटर अशा पदांचा समावेश आहे.

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १४ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. ही भरती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, नाशिक विभागासाठी असून, निवड झालेल्या उमेदवारांना नाशिकमध्ये नोकरी करण्याची संधी मिळेल. अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

इच्छुक उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रथम नोंदणी करावी. त्यानंतर आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करावा.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ मार्च २०२५ आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळेवर अर्ज दाखल करून सरकारी नोकरीची संधी मिळवावी.

Leave A Reply

Your email address will not be published.