खुशखबर ! IDBI बँकेत ६५० पदांची भरती; पदवीधरांसाठी सुवर्ण संधी! जाणून घ्या अर्ज कसा करायचा

Golden Opportunity for Graduates in IDBI Bank!

पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी ! IDBI बँकेत नोकरीची सुवर्ण संधी आहे. एकूण ६५० रिक्त जागा भरल्या जाणार आहे . या संबधीची अधिक माहिती खाली दिलेली आहे. अर्ज कसा करायचा ते खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाणून घ्या .

तुम्ही पदवीधर आहात आणि बँक भरतीची तयारी करत आहात? मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे! IDBI बँकेत (IDBI Bank) नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली असून, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (Junior Assistant Manager – JAM) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी करण्यात आली असून, पात्रता निकष, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख आणि वेतनमान याची संपूर्ण माहिती दिली आहे.

Golden Opportunity for Graduates in IDBI Bank!

एकूण 650 जागांची भरती करण्यात येणार असून, त्यामध्ये 260 जागा खुल्या प्रवर्गासाठी, 100 जागा अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी, 54 जागा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी, 65 जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गासाठी आणि 179 जागा इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गासाठी राखीव आहेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवाराचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल. उमेदवारांचे वय 1 मार्च 2025 रोजी गणले जाईल.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रथम ऑनलाइन चाचणी (Online Test) द्यावी लागेल. या परीक्षेत कटऑफ गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी (Interview) बोलावले जाईल. दोन्ही टप्प्यांत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल आणि त्यानंतर त्यांना नियुक्ती दिली जाईल. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 9 मार्च 2025 पासून सुरू होणार असून, 12 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्जात त्रुटी असल्यास किंवा अंतिम मुदतीनंतर अर्ज केल्यास तो स्वीकारला जाणार नाही. ही नोकरीची सुवर्णसंधी असून, इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा.

तसेच, नोकरी संदर्भात माहिती जाणून घ्यायचे असेल तर आमच्या news24.mahabharti.in ला रोज भेट दया.

Leave A Reply

Your email address will not be published.