महिलांसाठी सोन्याची संधी!लखपती दीदी योजना अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार ! -Golden Chance for Women!
Golden Chance for Women!
मुलींनो आणि बायकांनो, एक भन्नाट सरकारी योजना सध्या चर्चेत आली आहे – नाव आहे ‘लखपती दीदी योजना’. ह्या योजनेतून महिला बचत गटांमधल्या सदस्य बायकांना पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. म्हणजे उगाच कर्जावर व्याज नाही, फक्त स्वतःचा धंदा उभा करा आणि आत्मनिर्भर व्हा, एवढाच सरकारचा हेतू.
सध्या कुठे कुठे योजना चालतेय?
आत्तापर्यंत सात राज्यांमध्ये ही योजना राबवली जातेय. महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ गाजतेय आणि आता केंद्र सरकारची ही योजना पण बायकांमध्ये चांगलीच प्रसिद्ध होतेय.
काय आहे ह्या योजनेचा उद्देश?
सरकारचं म्हणणं आहे की, ग्रामीण भागातल्या आणि गरीब कुटुंबांतील महिलांनी स्वतःचा उद्योग सुरू करावा, त्यांना रोजगार मिळावा आणि त्या ‘लखपती’ व्हाव्यात, हाच या योजनेचा मुख्य हेतू.
ज्या महिलांचं कुटुंब ३ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेलं आहे, त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
कर्ज किती आणि कशासाठी मिळणार?
- सुरुवातीला कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं.
- त्यानंतर महिलेला स्वतःचा उद्योग सुरू करता यावा म्हणून १ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिलं जातं.
- ही योजना मुख्यतः महिला बचत गटांशी जोडलेली आहे.
काय अटी आहेत योजनेत सहभागी होण्यासाठी?
- अर्ज करणाऱ्या महिलेच्या घरी कोणीही शासकीय नोकरीत नसावा.
- महिला बचत गटामार्फत उद्योगाचं नियोजन तयार करावं लागतं.
- हाच आराखडा सरकारकडे सादर केला जातो आणि नंतर अर्जाची पडताळणी केली जाते.
अर्ज करताना लागणारी कागदपत्रं:
पासपोर्ट साईज फोटो ,आधार कार्ड ,शिधापत्रिका ,उत्पन्नाचा दाखला ,पत्त्याचा पुरावा ,बँक खाते तपशील ,मोबाइल नंबर
अर्ज कसा करायचा?
- अर्जदार महिलांनी महिला व बालविकास विभागाकडे अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारांनी अर्ज करता येतो.
- योजना सुरू करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून उद्योगाचा आराखडा तयार करावा लागतो.