अकरावी प्रवेश 2025: सराव आज-उद्या!-FYJC Admission 2025: Practice Now!

FYJC Admission 2025: Practice Now!

महाराष्ट्रातील अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी विभागाने https://mahafyjcadmissions.in संकेतस्थळ खुलं केलंय. या संकेतस्थळावरूनच विद्यार्थी अर्ज भरतील. १९ आणि २० मे रोजी विशेष सराव सत्र असणार आहे, ज्यात विद्यार्थी आपला अर्ज नोंदवून महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरतील. पण हे सराव नोंदणी प्रत्यक्ष प्रवेशासाठी गणली जाणार नाही.

FYJC Admission 2025: Practice Now!

शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने सांगितलंय की प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू होईल. २१ मे पासून प्रत्यक्ष अर्ज भरण्याची मुदत सुरू होईल आणि २८ मेपर्यंत ती चालू राहील.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळजवळ २५०० कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी कमी झाली आहे. राज्यभरात आता ९२८१ संस्था नोंदणीकृत आहेत. विद्यार्थ्यांना एक ते दहा महाविद्यालये पसंतीसाठी निवडता येतील.

सराव सत्रानंतर २० मे रोजी ही माहिती संकेतस्थळावरून हटवली जाईल आणि २१ मे पासून नवीन अर्ज भरावे लागतील, असं संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केलंय.

विद्यार्थ्यांनी आपली निवडलेली महाविद्यालयात ‘प्रोसीड फॉर ॲडमिशन’ बटणावर क्लिक करून प्रवेश निश्चित करावा लागेल. जर कोणाला दिलेल्या महाविद्यालयात प्रवेश नको असेल, तर पुढील फेरीची वाट पाहता येईल. पण जर प्रथम पसंतीच्या यादीत नाव आले तर प्रवेश न घेतल्यास पुढील फेरीत प्रवेशाचा हक्क राहणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.