तरुणांसाठी संधी !! बार्टी अंतर्गत १००० उमेदवारांना मोफत जर्मन प्रशिक्षण; दरमहा ४००० रुपये वेतन !

BARTI's Golden Chance! Free German Training!!

राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जर्मनीतील रोजगार संधीच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि निटकॉन, दिल्ली यांच्या वतीने जर्मन भाषेचे अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत एकूण 1,000 उमेदवारांना प्रशिक्षण मिळणार आहे.

BARTI's Golden Chance! Free German Training!!

बार्टी’कडून जर्मन भाषा प्रशिक्षणासाठी तीन महिन्यांचा कोर्स दिला जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मार्च २०२५ आहे. पात्र प्रशिक्षणार्थींना दरमहा ₹४,००० विद्यावेतन मिळणार आहे. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याच्याकडे राज्यातील अनुसूचित जातीचा अधिकृत दाखला असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ₹८ लाखांपर्यंत असावे आणि वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे निर्धारित करण्यात आली आहे. तसेच, उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता पूर्ण करणे बंधनकारक आहे.

कोण अर्ज करू शकतो?
नर्सिंग, लॅब असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, हॉटेल मॅनेजमेंट – पदविका किंवा पदवीधारक.
बीसीए, बीबीए, अकाउंटिंग (बीकॉम/एमकॉम), एमबीए (मार्केटिंग/सेल्स) – संबंधित पदवीधारक.
आयटीआय/डिप्लोमा/पदवीधारक (इलेक्ट्रिशिअन, ऑटोमोबाईल, मुवर्स/पॅकर्स) – पात्र.

प्रमाणपत्र व परीक्षा
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना गोएथे इन्स्टिट्यूटच्या परीक्षेसाठी सहाय्य केले जाईल. यशस्वी उमेदवारांना गोएथे इन्स्टिट्यूटचे प्रमाणपत्र मिळेल, जे जर्मनीत मान्य असेल.

अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी जवळच्या निटकॉन प्रशिक्षण केंद्रावर जाऊन अर्ज सादर करावा व मूळ कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन ‘बार्टी’ कडून करण्यात आले आहे. तसेच, उमेदवारांना पासपोर्ट, व्हिसा व अन्य आवश्यक कागदपत्रांसाठी मदत केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.