आता मिळवा ; दरमहा १ हजार रुपये विद्यावेतन आणि मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण ! – Free Competitive Exam Training !
Free Competitive Exam Training !
विद्यार्थ्यांनो मिळवा, दरमहा १ हजार रुपये विद्यावेतन आणि मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण ! चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती . आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण १ एप्रिल ते १५ जुलै २०२५ या कालावधीत होणार आहे. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा १ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांनी २५ मार्च २०२५ पर्यंत अर्ज सादर करावा. २६ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीसाठी उमेदवारांनी प्रशासकीय भवन, पहिला मजला, चंद्रपूर येथे मूळ कागदपत्रांसह हजर राहणे आवश्यक आहे. निवड यादी २७ मार्च २०२५ रोजी सायंकाळपर्यंत जाहीर केली जाईल.
या प्रशिक्षणासाठी अनु. जमाती (ST) प्रवर्गातील, वय १८ ते ३८ दरम्यान असलेले, किमान HSC (१२वी) उत्तीर्ण उमेदवार पात्र असतील. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रक, आधार कार्ड आणि नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्जात नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, जात आणि नोंदणी क्रमांक यासारखी माहिती भरावी व सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. योग्य उमेदवारांनी या मोफत संधीचा लाभ घ्यावा!
Fakt St category walech apply kru shktat ka obc nahi ka