महत्वाचे आता होणार लाडकी बहीण योजनेत पात्रतेची नव्याने तपासणी – पाच टप्प्यांतील चौकशी सुरू!

Ladki Bahin Latest Update Car Owner

 चारचाकी वाहनांनंतर उत्पन्न, कागदपत्रे आणि जमिनीची तपासणी; अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत तब्बल पाच लाख लाभार्थींची संख्येत घट (६५ वर्षांवरील, संजय गांधी निराधार योजनानमो शक्ती योजना लाभार्थी) झाली आहे. मात्र, अद्यापही योजनेतील लाभार्थींची संख्या तब्बल अडीच कोटींवर आहे.

Five-Stage Verification Process for Ladki Bahin Beneficiaries!

राज्यातील सव्वाचार कोटी महिला मतदारांपैकी अडीच कोटी महिलांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न प्रत्यक्षात अडीच लाखांपेक्षा कमी आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सरकारने पडताळणी प्रक्रिया हाती घेतली आहे. तसेच, एका कुटुंबातील दोन किंवा अधिक महिला लाभार्थी असल्यास त्याचीही चौकशी होणार आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून तालुका आणि जिल्हास्तरीय समित्यांकडून कागदपत्रांची योग्य पडताळणी झाली नाही. परिणामी, लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली व सरकारला योजनेसाठी दरमहा ३,८८० कोटी रुपये खर्च करावे लागले. यामुळे सरकारने आता तपासणी प्रक्रिया कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.

१९ लाख महिला शेतकऱ्यांना योजनेतील लाभात कपात!

केंद्र सरकारची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनांतर्गत महिला शेतकऱ्यांना दरवर्षी १२,००० रुपये मिळतात.

राज्यातील ९९ लाख महिला शेतकरी या योजनांचा लाभ घेत आहेत.

या महिलांना दरमहा १,००० रुपये मिळतात. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिला शेतकऱ्यांचा लाभ १,५०० रुपयांवरून ५०० रुपयांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरलेल्या महिलांकडून परतफेडीसाठी स्वतंत्र लेखाशिर्ष तयार करण्यात आले आहे. सध्या चारचाकी वाहन असलेल्या महिलांची पडताळणी सुरू असून, पुढील टप्प्यात इतर निकषांवर चौकशी केली जाणार आहे.

लाडकी बहिणींच्या पडताळणीचे महत्त्वाचे टप्पे

एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला लाभार्थी असतील तर चौकशी
वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर अपात्रता
बनावट कागदपत्रांवर योजना घेत असलेल्या महिलांची तपासणी
कुटुंबातील किमान एक व्यक्ती निवृत्तिवेतनधारक असल्यास चौकशी
पाच एकरांपेक्षा अधिक जमीन असलेल्या महिलांना योजनेतून वगळणे.

Leave A Reply

Your email address will not be published.