नागपूरमध्ये फिल्म सिटीसाठी हालचाली वेगवान… रामटेकजवळ १२८ एकर जमीन निश्चित!!

Film City news in Nagpur…!!

 नागपुरात फिल्म सिटीसाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या प्रकल्पासाठी रामटेकजवळील १२८ एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी विदर्भात फिल्म सिटी उभारण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले, ज्यामुळे चित्रपट निर्मितीला चालना मिळणार आहे.

Film City news in Nagpur…!!

रामटेकजवळील १२८ एकर जमीन हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पुढील १५ दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. तसेच, नागपूर फिल्म सिटी यशस्वी होण्यासाठी लवकरच सल्लागाराची नियुक्ती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आरबीआयचे नियमांनुसार कठोर पावले
आरबीआय लोकांच्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी ठरलेल्या नियम व मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम करत आहे. केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री यावर सखोल चर्चा करून सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहतील आणि लोकांना त्यांच्या ठेवी परत मिळतील, याची खात्री देतील, असे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

“सखोल चौकशी करा आणि कारवाई करा” – आशिष शेलार
रणवीर अलाहाबाद प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ‘कंदपोहे’ या अश्लील संवाद असलेल्या कार्यक्रमाबाबत विचारणा झाली असता, थिएटर मंडळाने जर अशा प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी दिली असेल, तर यासंदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, असे ते म्हणाले. लव्ह जिहाद कायदा समितीबाबत विचारणा झाल्यावर, त्यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले आणि त्यांनी फक्त तथ्यांवर आधारित वक्तव्य करण्याची भूमिका घेतली.

धस-मुंडे भेटीवर प्रतिक्रिया टाळली
भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची नुकतीच बैठक झाली. यावर प्रतिक्रिया देताना, आशिष शेलार यांनी या बैठकीबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यांनी फक्त वृत्तपत्रातून याची माहिती घेतली असून बैठक प्रत्यक्ष झाली का, ती खाजगी होती का, याबाबत ते अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले.

Leave A Reply

Your email address will not be published.