पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा २५ मार्चपासून – तयारी अंतिम टप्प्यात! | Exams from March 25 – Preparation in Final Stage!

Exams from March 25 – Preparation in Final Stage!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा २५ मार्चपासून सुरू होत आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने जाहीर केले जात असून, त्याची माहिती विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.

Exams from March 25 – Preparation in Final Stage!

विद्यापीठ प्रशासनाने संलग्न महाविद्यालयांना सर्व परीक्षा व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली आहे. पदविका अभ्यासक्रम, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवी परीक्षांचे आयोजन महाविद्यालयस्तरावर होणार आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे आणि अंतर्गत गुण भरण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर असेल.

बीए, बीकॉम आणि बीएससी अभ्यासक्रमांच्या परीक्षा २५ मार्चपासून सुरू होतील. तर विधी आणि बीबीए अभ्यासक्रमांच्या परीक्षा ९ एप्रिलपासून होणार आहेत. उर्वरित अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.

परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका बारकोड संबंधित अडचणी आल्यास ‘इमर्जन्सी बारकोड’ची सोय उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिली.

पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी अंतिम टप्प्यात असून, ते नोट्सचा आधार घेत अभ्यासात व्यग्र आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.