Maha TET परीक्षा २७ मे पासून सुरु !-Exam from May 27!
Exam from May 27!
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आयोजित केलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट २०२५) परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर www.mscepune.in वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही परीक्षा २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत दोन टप्प्यांत पार पडणार आहे.
राज्यभरातून तब्बल २ लाख २७ हजार २२९ उमेदवार या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट काढणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन “Maha TET Hall Ticket 2025” या लिंकवर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक किंवा नोंदणी आयडी टाकावा लागेल.
परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना प्रवेशपत्रात आणि वेबसाइटवरील सूचना पुस्तिकेत दिलेल्या आहेत, त्याचे पालन करणे आवश्यक आहे. यंदा परीक्षेचा कालावधी आधी २४ मेपासून निश्चित केला होता, मात्र गट क परीक्षा आणि इतर विद्यापीठांच्या परीक्षा लक्षात घेता ती २७ मेपासून पुढे ढकलण्यात आली आहे. ‘टेट’ परीक्षा ही शिक्षक भरती प्रक्रियेसाठी अनिवार्य असल्याने उमेदवारांनी वेळेत तयारीसह प्रवेशपत्र डाऊनलोड करावे.