खाद्यतेलाच्या किमतीत झाली मोठी वाढ! – बघा कोणत्या तेलात किती झाली वाढ!
Edible Oil New Rates
आताच प्राप्त बातमी नुसार सरकारने (Edible Oil) खाद्य तेलाच्या किमतींवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, जो 14 सप्टेंबरपासून लागू झाला आहे. या निर्णयाचा परिणाम शेतकरी आणि तेलाच्या किमतींवर होणार आहे. प्राप्त माहिती नुसार , कच्च्या पाम तेल, कच्च्या सोया तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावर 20 टक्के मूलभूत सीमा शुल्क लागू केले आहे. यामुळे या तेलांवरील एकूण आयात शुल्क 5.5 टक्क्यांवरून 27.5 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे, कारण या तेलांवर भारताच्या कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर तसेच सामाजिक कल्याण अधिभार लागू आहेत. रिफाइंड पाम तेल, रिफाइंड सोया तेल आणि रिफाइंड सूर्यफूल तेलांच्या आयातीवर 13.75 टक्के शुल्काच्या तुलनेत आता 35.75 टक्के आयात शुल्क लागू होणार आहे. या मुळे तेलाच्या किमतीत एकदम भरमसाठ वाढ होणार आहे. ऐन सणासुदीच्या काळात हा निर्णय लागू झाल्याने सर्वसामान्य माणसाच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे!!
सरकारनं कच्च्या तेलावरील आयात शुल्क 10 टक्क्यांनी वाढवलं आहे. मात्र, घोषणा होताच राज्यभरात खाद्य तेलाच्या दरात (Edible Oil Price) मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. खाद्या तेलाच्या दरात प्रति किलो 20 ते 25 रुपयांची वाढ झाल्याच समोरं आलं आहे. त्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांना झटका बसला आहे
सनविन ग्रुपचे सीईओ संदीप बाजोरिया यांनी सांगितले की, सरकार दीर्घकाळानंतर ग्राहक आणि शेतकरी यांच्यातील हितसंबंधांचा तोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन आणि रेपसीड पिकांसाठी सरकारने निश्चित केलेला किमान आधारभूत किंमत (MSP) मिळण्याची शक्यता वाढली आहे. सध्या देशांतर्गत सोयाबीनची किंमत प्रति 100 किलोग्रॅम सुमारे 4,600 रुपये आहे, जी राज्याने निश्चित केलेल्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहे. भारत आपली 70 टक्क्यांहून अधिक वनस्पती तेलाची मागणी आयातीच्या माध्यमातून पूर्ण करतो.
आज अचानक खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्य ग्राहकाला याची झळ बसली आहे. सोयाबीन दरवाढीसाठी तेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. सरकारनं ती मागणी मंजूर केली आहे. केंद्र सरकारकडून कच्चे सोयाबीन,पाम तेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात 20 टक्क्यां पर्यंत वाढ तर रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क 13.75 टक्क्यांवरुन वरून 35.75 टक्के वाढवण्यात आलं आहे. सोयाबीन दरवाढीसाठी तेलावरील आयात शुल्कात 20 ते 30 टक्के वाढ करावी ही मागणी करण्यात आली आहे.
केंद्र सरकारनं देशातील सोयाबीन (soybeans) बासमती तांदळासह (Basmati Rice) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारनं कांदा, बासमती तांदळावरील निर्यातमूल्य हटवले आहे. तसेच खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तेलावरील आयात शुल्क वाढवण्याच्या निर्णयानंतर खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा मोठा फटका सामान्य ग्राहकांन बसत आहे.