ड्रायव्हर असाल तर महाराष्ट्र सरकार द्वारे सरळ जर्मनीत नोकरीची संधी,सर्व खर्च सरकार करणार!

Driver Job In Germany


आपण जर चालक असाल तर आपल्यासाठी विदेशात सरळ नोकरीची सुवर्णसंधी आहे. सोबत पूर्ण खर्च आणि RTO द्वारे मोफत ट्रेनिंग सुद्धा मिळणार आहे. हि जर्मनीत नोकरीची एक सुवर्णसंधी आहे. कुशल मनुष्यबळ प्रदान कार्यक्रमाअंतर्गत आपल्या देशातून वाहतूक क्षेत्रातील मनुष्यबळ पुरविण्याच्या कराराप्रमाणे बाडेन वुटेनबर्ग या राज्यास कुशल वाहनचालक पुरविण्यासाठी बस, ट्रक, हलक्या आणि जड वाहनचालकांना या पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत जर्मनीस जाण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. जर्मन भाषेचे ज्ञान, वाहन असून, या संधीचा लाभ बेरोजगार युवकांनी घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार यांनी केले. राज्यात उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपियन युनियनमधील देशांना करता यावा व त्यायोगे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येऊन, त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत व्हावी दोन्ही देशांमधील संबंध सुदृढ होतील व अनेक सशक्त सामाजिक आर्थिक बदलांची सुरुवात जागतिक स्तरावर होऊन मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान प्राप्त होईल, असा शासनाचा मानस आहे.

इच्छुक वाहनचालकांना शासनामार्फत आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार असून, यामध्ये लेफ्ट हॅण्ड ड्राइव्ह, तसेच जर्मन भाषा प्रशिक्षण शासनामार्फत देण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत यासंबंधी मदत कक्ष उघडण्यात आला असून इच्छुक उमेदवारांनी मदत कक्षास संपर्क साधावा, तसेच उमेदवारांचा सर्व खर्च हा शासन करणार असल्याने जास्तीत जास्त वाहनचालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरटीओंनी केले आहे.



1 Comment
  1. उर्मिला रविंद्र शेंडे says

    माझे नाव उर्मिला रविंद्र शेंडे नागपूर आता पर्यंत पैसे आले नाही अप्रूप होऊन खूप दिवस झाले

Leave A Reply

Your email address will not be published.