नवीन बातमी !! महाराष्ट्रात तब्बल 3,064 डॉक्टरांच्या रिक्त पदांची भरती होणार !

Doctors Shortage, Healthcare in Crisis!

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग आधीच मूलभूत सुविधांच्या अभावाने त्रस्त असताना, आता आणखी एक मोठी समस्या उघड झाली आहे. कॅगच्या ताज्या अहवालानुसार, महाराष्ट्रात तब्बल 3,064 डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. या कमतरतेमुळे आरोग्य सेवा कोलमडण्याच्या मार्गावर आहे.

Doctors Shortage, Healthcare in Crisis!

संपूर्ण राज्यात 11,394 डॉक्टरांची पदे मंजूर असली तरी केवळ 8,330 डॉक्टर कार्यरत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागात 7,672 मंजूर पदांपैकी फक्त 5,989 डॉक्टर कार्यरत आहेत, तर वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागात 3,722 मंजूर पदांपैकी फक्त 2,341 डॉक्टर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे कंत्राटी तत्त्वावर असलेल्या 7,540 विशेषज्ञ डॉक्टरांपैकीही फक्त 4,701 पदे भरलेली आहेत.

आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांत अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या गट अ ते गट ड संवर्गातील 1,500 पदे रिक्त आहेत. यामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणावर प्रभावित होत आहे. याशिवाय, राज्याला स्वतंत्र आरोग्य धोरणच नाही, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

वैद्यकीय सुविधांचा अभाव, अपुरे डॉक्टर, परिचारिका आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. जर ही पदे लवकरात लवकर भरली नाहीत, तर राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी गंभीर संकटात सापडू शकते. त्यामुळे सरकारने तातडीने या समस्येवर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.