जिल्हा न्यायालयत कनिष्ठ लिपिक पदभरतीची नवीन जाहिरात प्रकाशित, त्वरित करा अर्ज!
district court Lipik bharti
प्रकाशित झालेल्या नवीन जाहिराती नुसार, जिल्हा न्यायालय, नाशिक येथे “कनिष्ठ लिपिक” पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज 18 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करावा. अर्ज उशिरा पोहोचल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. या संधीचा लाभ घेण्यासाठी सर्व इच्छुक उमेदवारांनी योग्यरित्या अर्ज करावा. हि उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ लिपिक | १. कर्मचारी कमीत कमी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर अमावा. तमेच कोणत्याही मान्याताप्राप्त विद्यापीठाचा पदव्युत्तर पदवी आणि कायद्याच्या (विधी) पदवीधगम प्राधान्य दिलं जाईल.
२. सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा I.T.I.) यामध्ये इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती. |
जिल्हा न्यायालय, नाशिक येथे “कनिष्ठ लिपिक” पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, त्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून त्यानुसार अर्ज करावा. नोकरीचे ठिकाण नाशिक असून, निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावा. अर्ज सादर करताना त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता “जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक” असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर 2024 आहे. या मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. या भरतीसंदर्भातील अधिक माहितीसाठी आणि जाहिरातीची मूळ प्रत पाहण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट https://nashik.dcourts.gov.in/ वर भेट द्यावी. ही एक चांगली संधी आहे, त्यामुळे सर्व पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
Hi