आता डिजिटल सातबारा! कागदपत्रं थेट ऑनलाइन!-Digital 7/12! Get Documents Online!

Digital 7/12! Get Documents Online!

आता रेकॉर्ड विभागात जाण्याची गरज नाही; शेतजमिनीची सगळी कागदपत्रं लवकरच ऑनलाईन मिळणार! महसूल आणि नगर भूमी अभिलेख विभागाचं १ कोटी ३९ लाख अभिलेखांचं डिजिटलायझेशन पूर्ण झालंय. सध्या सगळी कागदपत्रं डिजिटल सहीसह उपलब्ध करून देण्याचं काम जोरात सुरू आहे.

Digital 7/12! Get Documents Online!

आत्तापर्यंत कागदपत्रांच्या प्रमाणिकरणासाठी कार्यालयात जावं लागायचं. पण लवकरच सगळी कागदपत्रं ऑनलाइन उपलब्ध होतील. तहसीलच्या रेकॉर्ड रूममधील आणि भूमी अभिलेख कार्यालयातील अनावश्यक धावपळ आणि पैसे मोजण्याचा ताप संपणार आहे.

यापुढे कोणत्याही तहसीलमध्ये जाऊन नक्कल काढण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही. सरकारी वेबसाईटवरून थेट कागदपत्रं डाउनलोड करता येणार असून, डिजिटल सही लागली तर ऑनलाइन शुल्क भरून ती मिळवता येतील.

कोणती कागदपत्रं मिळणार?

  • टिपण बुक, गुणाकार बुक, आकारफोड पत्रक
  • आकार प्रपत्र, कमी-जास्त पत्रक, आकार बंध
  • ९/३, ९/४, शेतपुस्तक, दुरुस्ती अभिलेख
  • ताबा पावत्या, चौरस नोंद वही, मिळकत पत्रिका
  • जुनं सातबारा, आठ अ, फेरफार, नकाशा
  • सिटी सर्व्हेतील मालमत्ता पत्रक आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं

हे सगळं येत्या सहा महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर महसूल आणि नगर भूमी अभिलेख विभागाची सगळी कागदपत्रं डिजिटल सहीसह ऑनलाइन मिळतील. – शिवाजी भोसले, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, कोल्हापूर.

Leave A Reply

Your email address will not be published.