CLAT PG सुधारित निकाल जाहीर झाला !-CLAT PG Revised Result Out!
CLAT PG Revised Result Out!
CLAT PG 2025 परीक्षेच्या उत्तर की आणि निकालात गडबड झाल्यानं अनेक विद्यार्थ्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुढं हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेलं. पण सुप्रीम कोर्टानं सांगितलं की, दिल्ली हायकोर्टच ह्या प्रकरणावर सुनावणी करणार.
त्याअनुसार, दिल्ली उच्च न्यायालयानं राष्ट्रीय कायदा विद्यापीठांच्या कन्सोर्टियमला निकालातल्या सगळ्या त्रुटी काढून टाकून, सुधारित निकाल जाहीर करायचे आदेश दिले.
त्या आदेशाच्या आधारे, CLAT PG चा सुधारित निकाल आता जाहीर झाला असून, उमेदवार consortiumofnlus.ac.in/clat-2025 या संकेतस्थळावर जाऊन आपले गुण पाहू शकतात.
समुपदेशनात तब्बल ५ महिन्यांचा विलंब
निकालाच्या गोंधळामुळे LLM प्रवेशासाठी होणारं समुपदेशन ५ महिन्यांहून अधिक लांबले. आता नवीन सुधारित निकालानंतर समुपदेशनाची तारीख लवकरच जाहीर होईल. पात्र उमेदवारांनी लवकरच पोर्टलवर नोंदणी करून पर्याय भरायला हवेत.
प्रश्न क्रमांक ५६, २१, ५७ आणि ९८ यावर विद्यार्थ्यांनी सर्वाधिक आक्षेप घेतले होते.