CISF क्रीडा भरती सुरू!-CISF Sports Quota Jobs Open!
CISF Sports Quota Jobs Open!
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं (CISF) हेड कॉन्स्टेबल पदासाठी स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत भरती जाहीर केलीये. एकूण 403 जागा उपलब्ध आहेत, आणि ही भरती 17 ते 23 मे 2025 दरम्यान प्रकाशित झालेल्या रोजगार समाचारातून अधिकृतरीत्या जाहीर झालीये.
अर्ज करण्याची सुरुवात 18 मे 2025 पासून झाली असून, शेवटची तारीख 6 जून 2025 आहे. म्हणजेच इच्छुकांनी वेळ वाया न घालवता अर्ज करायला पाहिजे. अर्ज करणाऱ्याचं वय 1 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षं दरम्यान असायला हवं. आरक्षणाच्या प्रवर्गांमध्ये केंद्र शासनाचे नियम लागू राहतील.
हेड कॉन्स्टेबल स्पोर्ट्स भरती प्रक्रियेची खासियत म्हणजे ही थोडी वेगळी आणि स्पर्धात्मक आहे. उमेदवारांची पहिल्यांदा ट्रायल टेस्ट घेतली जाणार असून खेळातील कौशल्य प्रत्यक्ष पाहिलं जाणार. त्यानंतर प्रावीण्य चाचणी – म्हणजे आधीच्या स्पर्धांतले तुमचे यश, त्यानुसार स्कोअर दिला जाणार. मग PST, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शेवटी मेडिकल तपासणी.
बारावी पास असणं आवश्यक आहे. खेळात राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावर मान्यताप्राप्त संघटनेतून खेळलेलं असावं लागतं.
अर्ज करण्यासाठी cisfrectt.cisf.gov.in ह्या संकेतस्थळावर जावं लागेल. अधिसूचना नीट वाचून सर्व डॉक्युमेंट तयार ठेवून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. अर्जाची प्रिंट सुद्धा काढा. ही एक सोन्याची संधी आहे क्रीडापटूंना सरकारी सेवेमध्ये सहभागी होण्यासाठी!