सरकारी नोकरी मिळवा !! नगरपालिका येथे ८७० मुख्याधिकारी पदांची भरती ! जाणून घ्या अधिक माहिती
Chief Officers' Posts Vacant in State!
नगरपालिका कारभार अडचणीत
गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत, त्यामुळे संपूर्ण कारभार प्रशासकांवर अवलंबून आहे. त्यातच आता राज्यातील 35% म्हणजेच 242 मुख्याधिकारी पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.
शहर विकासावर परिणाम
नगरपालिकांच्या माध्यमातून शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन यांसारखी महत्त्वाची कामे पार पडतात. मात्र, मुख्याधिकारी नसल्याने ही कामे खोळंबली आहेत. राज्यात मुख्याधिकारी संवर्गातील 870 मंजूर पदांपैकी केवळ 435 अधिकाऱ्यांवर संपूर्ण कारभार सांभाळला जात आहे.
नगरविकास खात्याची चालढकल
गट-अ मधील 300 मंजूर पदांपैकी 188 तर गट-ब मधील 377 पैकी 54 पदे रिक्त आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून नगरविकास खात्याकडून या रिक्त पदांच्या भरतीबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
अग्निशमन सेवा कर्मचारीही अपूर्ण
उन्हाळ्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होते, मात्र 471 मंजूर पदांपैकी तब्बल 403 अग्निशमन कर्मचारी पदे रिक्त असल्याने ही सेवा ठप्प झाली आहे. केवळ 68 कर्मचारी संपूर्ण राज्यभरात सेवा देत असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.
इतर कर्मचाऱ्यांचीही टंचाई
मुख्याधिकारींसोबतच इतर कर्मचारी पदांवरही मोठा तुटवडा आहे. स्थापत्य अभियंता, लेखापाल, कर निर्धारक, स्वच्छता निरीक्षक आदी पदांपैकी शेकडो जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासक असूनही दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे.