खुशखबर !! चंद्रपूर येथे २९ मार्चला भव्य रोजगार मेळावा , थेट मुलाखत ;सरळ भरती ! संधी च सोनं करा
Chandrapur Mega Job Fair – March 29!
चंद्रपूर जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने २९ मार्च रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत भद्रावती येथील स्वागत सेलिब्रेशन येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रोजगार संधींची मोठी संधी!
आमदार अॅड. अभिजित वंजारी यांच्या पुढाकाराने आयोजित या मेळाव्यात महाराष्ट्रातील ४० हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाईल आणि नियुक्तीपत्र त्वरित प्रदान केले जाईल.
कोण सहभागी होऊ शकतात?
- चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पदवीधर बेरोजगार
- सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य – abhijitwanjari.com वर ऑनलाईन नोंदणी करावी.
- २९ मार्च रोजी शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणे आवश्यक.
मुलाखती आणि निवड प्रक्रिया
- उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार टोकण क्रमांक देण्यात येईल.
- त्या क्रमांकानुसार विशिष्ट दालनात मुलाखती होतील.
- निवड झालेल्या उमेदवारांना मेळाव्यातच नियुक्तीपत्र दिले जाईल.
सर्व पदवीधर बेरोजगारांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि भविष्यातील करिअरची पहिली पायरी इथेच टाकावी!