होळीच्या सणानिमित्त मध्य रेल्वेच्या २८ विशेष गाड्या !
Central Railways 28 Special Trains!
होळीच्या सणानिमित्त मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबई – नागपूर / मडगाव / नांदेड आणि पुणे – नागपूर दरम्यान २८ विशेष होळी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष (८ सेवा)
ट्रेन क्रमांक 02139
- सुटण्याची तारीख: ०९, ११, १६ आणि १८ मार्च २०२५ (रविवार आणि मंगळवार)
- वेळ: रात्री १२.२० (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)
- पोहोचण्याची वेळ: दुपारी ३.१० (नागपूर)
ट्रेन क्रमांक 02140
- सुटण्याची तारीख: ०९, ११, १६ आणि १८ मार्च २०२५ (रविवार आणि मंगळवार)
- वेळ: रात्री ८.०० (नागपूर)
- पोहोचण्याची वेळ: दुपारी १.३० (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)
संरचना:
- १ प्रथम वातानुकूलित, १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, १० तृतीय वातानुकूलित, ४
- शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, २ गार्ड ब्रेक व्हॅन.
थांबे:
- दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापुर,
- बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव साप्ताहिक विशेष (४ सेवा)
ट्रेन क्रमांक 01151
- सुटण्याची तारीख: ०६ आणि १३ मार्च २०२५ (गुरुवार)
- वेळ: रात्री १२.२० (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)
- पोहोचण्याची वेळ: दुपारी १.३० (मडगाव)
- होळीच्या प्रवासासाठी या विशेष गाड्यांचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी तिकीट आरक्षण लवकरात लवकर करावे.