बँकेत नोकरीची संधी !! सेंट्रल बँक ऑफ इंडियात ४५०० पदांची भरती सुरु !वेळ न घालवता आजच अर्ज करा
Central Bank Bharti for 4500 Various Posts 2025
बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यासाठी ; सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी आहे. या भरती मध्ये एकूण ४,५०० रिक्त जागा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२५ ही आहे. तर अधिकृत वेबसाईट वर जावून लवकरात लवकर अर्ज करा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने अप्रेंटिस पदांसाठी मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. ही भरती मोहीम सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सेंट्रल बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर centralbankofindia.co.in जाऊन ऑनलाइन अर्ज करता येईल.
या भरतीअंतर्गत एकूण ४,५०० जागा भरल्या जाणार आहेत, त्यामुळे नोकरीच्या संधीच्या दृष्टीने ही एक सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जून २०२५ असून, अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख २५ जून २०२५ आहे. या भरतीसाठीची ऑनलाइन परीक्षा जुलै २०२५ च्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पात्रता, निवड प्रक्रिया व इतर तपशील अधिकृत जाहिरातीत पाहता येतील.
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
उमेदवारांकडे भारत सरकारमान्य विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे, किंवा केंद्र सरकारमान्य समकक्ष पात्रता स्वीकारली जाईल.
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षे दरम्यान असावे.
उमेदवार NATS (National Apprenticeship Training Scheme) पोर्टलवर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडेल:
BFSI सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया (BFSI SSC) मार्फत ऑनलाइन परीक्षा
राज्याच्या स्थानिक भाषेतील चाचणी
परीक्षेत १०० वस्तुनिष्ठ प्रश्न असतील आणि कमाल गुण १०० असतील.
विशेष बाब म्हणजे चुकीच्या उत्तरांसाठी कोणतेही नकारात्मक गुण देण्यात येणार नाहीत.