1000 ”क्रेडिट ऑफिसर’ पदांची सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे भरती;त्वरित अर्ज करा !

Central Bank of India - Recruitment 2025!!

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड- क (JMGS-I) वरील ‘क्रेडिट ऑफिसर’ पदासाठी मोठ्या संख्येने भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही नोकरीची उत्तम संधी आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फिनान्स (PGDBF) कोर्स पूर्ण करणे बंधनकारक आहे.

Central Bank of India - Recruitment 2025!!

पदसंख्या आणि आरक्षण:
या भरती प्रक्रियेत एकूण 1000 पदे उपलब्ध आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती (अजा) साठी 150, अनुसूचित जमाती (अज) साठी 75, इतर मागासवर्गीय (इमाव) साठी 270, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) साठी 100, आणि खुल्या प्रवर्गासाठी 405 पदे राखीव आहेत. तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी 40 पदे उपलब्ध असून त्यामध्ये HI, VI, OC, आणि ID या प्रत्येक कॅटेगरीसाठी 10 जागा आरक्षित आहेत.

पात्रता आणि निवड प्रक्रिया:
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. सर्व सेमिस्टर्समध्ये मिळून किमान 60% गुण असणे गरजेचे आहे, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ही पात्रता 55% गुण ठेवण्यात आली आहे. अर्जदाराचे वय 20 ते 30 वर्षे दरम्यान असावे (30 नोव्हेंबर 2024 पर्यंत).

निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होईल – (i) ऑनलाइन परीक्षा आणि (ii) मुलाखत. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना 1 वर्षाच्या PGDBF कोर्समध्ये प्रवेश दिला जाईल. या कोर्समध्ये 9 महिने क्लासरूम ट्रेनिंग आणि 3 महिने ऑन-जॉब ट्रेनिंग असेल. कोर्स पूर्ण करताना उमेदवारांनी JAIIB ही परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

वेतन आणि फायदे:
उमेदवारांनी एक वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यास त्यांना असिस्टंट मॅनेजरच्या पदावर कायम नियुक्त केले जाईल. वेतन श्रेणी बेसिक 48,480/- पासून सुरू होऊन 85,920/- पर्यंत असेल.

अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत https://centralbankofindia.co.in/en या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज करण्यासाठी 750 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

ही सुवर्णसंधी गमावू नका! इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करून आपल्या करिअरला चालना द्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.