कोणतीही परीक्षा न देता मिळणार सेंट्रल बँकेत नोकरी;७वी पास ते पदवीधर उमेदवार करु शकतात अर्ज!

central bank bharti 10th pass


बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियमध्ये नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये १३ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, अटेंडर, वॉचमॅन आणि गार्डनर पदासाठी ही भरती करण्यात आली आहे. तुम्ही centralbankofinidia.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

Central Bank Bharti

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. फॅकल्टी पदासाठी ३ जागा रिक्त आहेत. ऑफिस असिस्टंट पदासाठी ५ जागा तर अटेंडरसाठी ३ जागा रिक्त आहेत.

पात्रता
फॅकल्टी पदसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच उमेदवाराला कॉम्प्युटरची माहिती असायला हवी.उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. ऑफिस असिस्टंट पदासाठी उमेदवाराकडे बीएसडब्ल्यू/बीए/ कॉम्प्युटर सायन्स ही पदवी असायला हवी. उमेदवाराला एमएम ऑफिसचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तर वॉचमॅन आणि गार्डनर पदासाठी ७वी पास उमेदवार अर्ज करु शकतात.

पुणे महानगरपालिकेत १२वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ६८१ पदांसाठी भरती सुरु; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या या नोकरीसाठी २२ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. फॅकल्ट पदासाठी ३०,००० रुपये मासिक वेतन मिळणार आह तर ऑफिस असिस्टंट पदासाठी २०,००० रुपये वेतन, अटेंडर पदासाठी १४,००० रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.



1 Comment
  1. Vilas Shamrao Kamble says

    सरकारी नोकरी

Leave A Reply

Your email address will not be published.