सीबीएसई दहावी आता दोनदा!-CBSE 10th Exam Twice a Year!
CBSE 10th Exam Twice a Year!
आता CBSE दहावीची परीक्षा वर्षात दोन वेळा होणार हे नक्की झालंय. पहिली फेब्रुवारीत, दुसरी मे महिन्यात. आणि भारी गोष्ट ही की, ज्या परीक्षेत जास्त मार्क्स मिळतील, तीच मार्कशीट ग्राह्य धरली जाणार! विद्यार्थ्यांना एकदम दिलासा म्हणायचा.
२०२६ पासून हे लागू होणार असून, पहिली परीक्षा १७ फेब्रुवारीपासून सुरु होईल, तर दुसरी म्हणजे पुरवणी परीक्षा ५ मेपासून. पहिल्या परीक्षेचा निकाल २० एप्रिलपूर्वी, आणि दुसरीचा निकाल जूनमध्ये येईल.
गुण वाढवायचा ‘चान्स’
एखाद्या विद्यार्थ्याचा एखाद्या विषयात मार्क कमी आला, तर त्याला मे महिन्यातल्या परीक्षेत पुन्हा बसता येईल. पण ३ विषयांपेक्षा जास्त विषयात नापास झालं, तर पूर्ण वर्ष परत शिकावं लागणार. म्हणजे हे ‘कट ऑफ’ सुधारणं वगैरे सगळं फक्त थोडक्यांत असलेल्यांसाठीच आहे.
कायदेशीर आणि पारदर्शक बदल
CBSE बोर्डनं सांगितलं की, ही सगळी व्यवस्था राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत सुरू करण्यात आलीये. पहिली परीक्षा अनिवार्य आहे, दुसरी ऐच्छिक. आणि दोन्हीतले जास्त गुण असलेलेच फायनल मार्कशीटमध्ये येणार.
शाळांनी काय करायचं?
पहिल्या परीक्षेनंतर शाळांनी पालकांना सगळी माहिती देणं बंधनकारक आहे. दुसऱ्या परीक्षेला बसण्यासाठी पालकांची लिहून संमती घ्यावी लागणार आणि CBSEचा विशेष ‘अपार ID’ देखील असावा लागणार.
गर्मीच्या भागात विशेष मुभा
जे विद्यार्थी ज्या भागांत उन्हं जास्त असतात, त्यांना कुठली परीक्षा द्यायची ते निवडता येणार आहे. हा मोठा बदल त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल.
खेळाडूंना विशेष सवलत
राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धेत भाग घेतलेल्यांना CBSEकडून स्पेशल सवलत मिळणार आहे. ते पहिली किंवा दुसरी – एकच परीक्षा द्यावी लागेल. फक्त त्यासाठी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र लागतंय.