खुशखबर! Capgemini या कंपनी मध्ये १६०० पेक्षा पदासाठी भरती प्रक्रिया सुरु! उत्तम करिअर संधी
Capgemini – Great Career Opportunities!!
मित्रांनो, जर आपण करियरच्या नवीन दिशा शोधत असाल तर आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे!! कन्सल्टिंग, तंत्रज्ञान सेवा आणि डिजिटल परिवर्तनातील आघाडीची कंपनी कॅपजेमिनी भारतभर वित्त, HR आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध पदांसाठी भरती करत आहे. कोलकाता, बंगळुरू आणि नोएडा यांसारख्या ठिकाणी 1600 पेक्षा अधिक नोकऱ्या उपलब्ध असून, नवोदित आणि अनुभवी व्यावसायिकांसाठी उत्तम करिअर संधी निर्माण होत आहे. चला तर माहिती करूया या बद्दल पूर्ण माहिती..
वित्त क्षेत्रातील संधी
कॅपजेमिनी आपल्या आर्थिक लेखापद्धती मजबूत करण्यासाठी अकाउंट्स पेयेबल आणि रिसीवेबल, फायनान्शियल अॅनालिस्ट, जनरल लेजर अकाउंटंट, ऑडिट आणि कंप्लायन्स स्पेशालिस्ट, कर सल्लागार आणि ट्रेझरी अॅनालिस्ट या पदांसाठी भरती करत आहे. हे पदे विविध ठिकाणी उपलब्ध असून, जागतिक स्तरावर आर्थिक क्षेत्रात प्रगती करण्याची उत्तम संधी आहे.
मानव संसाधन (HR) विभागातील संधी
HR क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात भरती होत असून, टॅलेंट अक्विझिशन, लर्निंग आणि डेव्हलपमेंट, कॉम्पेन्सेशन आणि बेनिफिट्स, HR शेअर्ड सर्व्हिसेस आणि एम्प्लॉयी रिलेशन्स व ऑपरेशन्स या विभागांमध्ये भरती सुरू आहे. नवोदित आणि अनुभवी HR व्यावसायिकांसाठी एकाधिक ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी
कॅपजेमिनी उत्पादन व्यवस्थापन, डेटा अॅनालिस्ट, SCADA अभियंते, टीम लीड्स आणि UI डिझाइनर अशा अनेक टेक्नॉलॉजी-आधारित पदांसाठी उमेदवार शोधत आहे. हे पदे फ्रेशर्स आणि अनुभवी व्यावसायिकांसाठी उपलब्ध असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळणार आहे.
कॅपजेमिनीची ही भरती मोहीम वित्त, HR आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी ठरत आहे. विविध ठिकाणी भरती होत असल्यामुळे, कंपनीने जागतिक स्तरावर नोकरी देणाऱ्या सर्वोत्कृष्ट नियोक्त्यांपैकी एक म्हणून आपली ओळख कायम ठेवली आहे.
कॅपजेमिनी बद्दल
कॅपजेमिनी ही व्यवसाय आणि तंत्रज्ञान परिवर्तनामध्ये जागतिक आघाडीची कंपनी असून, 340,000+ कर्मचारी, 50+ देशांत उपस्थिती आणि 2023 मध्ये €22.5 अब्ज महसूल यांसह AI, क्लाउड आणि डेटा-संचालित उपाय पुरवते. 55+ वर्षांपासून उद्योग आणि समाजात सकारात्मक बदल घडवत आहे.