१० वी पास उमेदवारांसाठी, सीमा रस्ते संघटना (BRO) मध्ये ४११ पदांची भरती; अर्ज करा !
BRO Recruitment 2025
BRO Recruitment 2025 : सीमा रस्ते संघटना अंतर्गत 411 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे.” MSW Cook, MSW Mason, MSW Blacksmith, and MSW Mess Waiter” या पदांची भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारानीं २४ फेब्रुवारी २०२५ पूर्वी अर्ज करावा. या भरतीसाठी १० वी पास उमेदवार सुद्धा अर्ज सादर करू शकता. हि भरती म्हणजे नोकरीची एक सुवर्णसंधीच आहे. या भरतीसाठी अर्जाची पद्धती, PDF जाहिरात आणि अन्य सर्व माहिती आम्ही खालील लिंक्स वर दिलेली आहे.
BRO (बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन) ने “MSW कूक, MSW मॅसन, MSW ब्लॅकस्मिथ, आणि MSW मेस वेटर” या पदांसाठी नवीन भरतीची सूचना जाहीर केली आहे. BRO भर्ती 2025 अंतर्गत एकूण 411 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अंतिम तारीख पूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे.
रिक्त पदांचा तपशिल : BRO (बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन) ने “MSW कुक, MSW मेसन, MSW लोहार आणि MSW मेस वेटर” या पदांसाठी एकूण 411 रिक्त जागा जाहीर केली आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, यासाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे असावी. अर्ज पद्धती ऑफलाईन आहे, आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता कमांडंट GREF सेंटर, दिघी कॅम्प, पुणे-411015 आहे. अर्ज करण्याची अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट www.bro.gov.in येथे भेट देऊ शकता.
वयोमर्यादा: सीमा रस्ते संघटनेच्या या भरतीत सामील होण्यासाठी, उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे असावे. तथापि, नियमांनुसार राखीव प्रवर्गांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाते.
निवड प्रक्रिया- उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, पीईटी, प्रॅक्टिकल टेस्ट (ट्रेड टेस्ट), वैद्यकीय परीक्षा इत्यादी टप्प्यांमधून केली जाईल. या भरतीमध्ये, शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) हि पात्रात ह्मणून असेल. ज्यामध्ये उमेदवारांना १० मिनिटांत १.६ किमी धावावे लागेल. या भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार बीआरओच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा दिलेली PDF जाहिरात पहावी.
अर्ज शुल्क– उमेदवार अधिसूचनेत दिलेल्या लिंकद्वारे अर्ज शुल्क भरू शकतात. सामान्य ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांना ५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. राखीव प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही.
अर्ज कसा करावा : या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज फक्त इंग्रजी/हिंदीमध्ये भरला जाईल. कोणताही उमेदवार एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज पाठवणार नाही. फक्त पुरुष उमेदवारांनीच अर्ज करणे आवश्यक आहे, महिला उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही. अर्ज शेवटच्या तारखेच्या अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच, सरकारी नोकरीच्या नवीन जाहिराती बद्दल जाणून घेण्यासाठी news24.mahabharti.in ला रोज भेट दया.