आनंदाची वार्ता !! BPNL अंतर्गत १० वी पास तरुणांसाठी तब्ब्ल २१५२ पदांची भरती ! त्वरित अर्ज करा

BPNL Recruitment 2025!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय पशुसंवर्धन निगम लिमिटेड (BPNL) ने 2025 साठी विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीत एकूण 2,152 रिक्त पदे आहे .

BPNL Recruitment 2025!

त्यामध्ये पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी (362 पदे), पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक (1,428 पदे) आणि पशुधन फार्म ऑपरेशन असिस्टंट (362 पदे) यांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांनी 12 मार्च 2025 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.

पात्रतेच्या निकषांनुसार, पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी पदासाठी पदवी आवश्यक आहे, गुंतवणूक सहाय्यकसाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर ऑपरेशन असिस्टंट पदासाठी किमान 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. वेतनश्रेणी अनुक्रमे गुंतवणूक अधिकारी – ₹38,200/- प्रति महिना, गुंतवणूक सहाय्यक – ₹30,500/- प्रति महिना, आणि ऑपरेशन असिस्टंट – ₹20,000/- प्रति महिना अशी असेल.

निवड प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा (50 गुण), मुलाखत (50 गुण), कागदपत्र पडताळणी आणि एक दिवसीय प्रशिक्षण सत्र यांचा समावेश असेल. उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी संधीचा लाभ घेऊन लवकरात लवकर अर्ज करावा!

Leave A Reply

Your email address will not be published.