लिपिक भरतीसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; रोज तीन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येणार
BMC Lipik Bharti Time Table
BMC Lipik Bharti Time Table: बृहन्मुंबई महानगरपालिकेने कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी परीक्षा वेळापत्रक (BMC Lipik Bharti Time Table) जाहीर केले आहे. ही परीक्षा २ ते ६ डिसेंबर २०२४ आणि ११-१२ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील विविध शहरांमधील केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावीत आणि दिलेल्या वेळापत्रकानुसार संबंधित परीक्षा केंद्रावर निश्चित वेळेत उपस्थित राहावे, असे महानगरपालिकेने कळवले आहे. तसेच या परीक्षेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न या लिंक वर उपलब्ध आहे.
१,८४६ रिक्त पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा
बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे लिपिक पद) संवर्गातील १,८४६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून २० ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२४ दरम्यान अर्ज मागविण्यात आले होते. याशिवाय, सुधारित अर्ज सादर करण्याची वेळही प्रशासनाने कळवली आहे. उमेदवारांनी संबंधित सूचना आणि पात्रतेचे तपशील ध्यानपूर्वक वाचून अर्ज करावेत.
BMC Lipik Exam Date
परीक्षेसाठी रोज तीन सत्रांमध्ये परीक्षा
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक (लिपिक) पदांसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया २१ सप्टेंबर २०२४ पासून ११ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑनलाइन पद्धतीने झाली होती. उमेदवारांसाठी २ डिसेंबर २०२४ ते ६ डिसेंबर २०२४ दरम्यान तसेच ११ आणि १२ डिसेंबर २०२४ रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी रोज तीन सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाईल. उमेदवारांनी त्यांचे अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून, संबंधित खात्यातून प्रवेशपत्र डाऊनलोड करावे आणि ते वेळेत संबंधित परीक्षा केंद्रावर दाखवावे.
Aaplya la railway sathi from bhrach ahe sir