बृहन्मुंबई महानगरपालिकेत १ हजार ८४६ पदांची मोठी भरती सुरू! – BMC Bharti 2024

BMC Bharti 2024


बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या जागांसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११.५९ मिनिटे ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि वेळ आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील BMC Bharti 2024 https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे. 

 

अनुसूचित जाती (१४२), अनुसूचित जमाती (१५०), विमुक्त जाती-अ (४९), भटक्या जमाती-ब (५४), भटक्या जमाती-क (३९), भटक्या जमाती-ड (३८), विशेष मागास प्रवर्ग (४६), इतर मागासवर्ग (४५२), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (१८५), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (१८५), खुला प्रवर्ग (५०६) याप्रमाणे रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाईल.

आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’मधील रुपये २५,५००-८१,१०० (पे मॅट्रिक्स-एम १५) अधिक भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ही पदे भरण्यात येणार आहेत.

 

 



Leave A Reply

Your email address will not be published.