लाडकी बहीण योजनेत झालेला मोठा बदल, जाणून घ्या महत्वाचा अपडेट जाहीर!

Big Change in Ladki Bahin Yojana!

सरकारने अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांसाठी “लाडकी बहीण योजना” सुरू केली असून, या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला ₹१५०० जमा केले जात आहेत. आतापर्यंत सात हफ्ते जमा झाले असून, फेब्रुवारीचा हफ्ता वितरित करण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र, सुरुवातीपासूनच या योजनेसाठी काही निकष निश्चित करण्यात आले होते.

Big Change in Ladki Bahin Yojana!

अपात्र महिलांचे अर्ज फेटाळले!

योजनेचा गैरफायदा घेत अनेक अपात्र महिलांनी अर्ज केले आणि लाभ घेतला. मात्र, सरकारला हे लक्षात येताच, अपात्र लाभार्थींना योजनेतून वगळण्याची मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत तब्बल ५ लाख अपात्र महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले. विरोधकांनी सरकारवर टीका करत ही योजना बंद पडणार असल्याच्या चर्चा केल्या. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, ही योजना बंद होणार नाही.

विरोधकांवर एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

गोंदिया येथे बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, “लाडक्या बहिणींच्या विरोधात जाणाऱ्यांना माझ्या बहिणींनी जोडा दाखवला आहे.” तसेच, त्यांनी भंडारा विधानसभा मतदारसंघासाठी ₹३५००-४००० कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती दिली. त्यांनी विरोधकांना टोला लगावत म्हटले की, “मोदीजींना डोनाल्ड ट्रम्प महान म्हणतात, तर काही लोकांना पोटशूळ होतो. एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यावरही यांना त्रास होतो.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं की “लाडकी बहीण योजना सुरूच राहील आणि लाभार्थींना नियमित मदत मिळत राहील.”

Leave A Reply

Your email address will not be published.